Comrade Adam Master –
सोलापूर प्रतिनिधी –
सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने २४९, सोलापूर शहरमध्य विधान सभा मतदार संघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या माझे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. महायुतीचा पराभव करण्यासाठी आणि जनतेला खोटी स्वप्ने विकणाऱ्या शिंदे सरकारचा पाडाव करण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधलेला आहे. या निवडणुकीत जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांचे धाबे दणाणल्या शिवाय सोडणार नाही. राज्यात माजलेली अराजकता आणि सत्तापिपासू यांचा पराभव करण्यासाठी जनता आता सज्ज झालेली आहे. येत्या २३ नोव्हेंबरला पुरोगामी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल आणि जनतेच्या विकासाला गती प्राप्त होईल असा विश्वास ज्येष्ठनेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर माध्यम परिवाराशी बोलताना व्यक्त केले.