शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी कॉर्नर बैठका
सोलापूर (प्रतिनिधी)
दक्षिण तालुक्यात सन 2014 पासून जनतेने आपल्याला सेवेचे संधी दिली आहे आपण येथे दहा वर्षापासून आमदार आहे आतापर्यंत काँग्रेसने 30 वर्षात जेवढा निधी आणला नाही तेवढा निधी आपण या दहा वर्षात आणलेला आहे. मतदारसंघातील शहरी भाग असो व ग्रामीण भाग असो दोन्हीकडे आपण मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. यापुढेही आणखी विकास करायचा आहे.त्यासाठी पुन्हा एकदा जनतेने आपल्याला संधी द्यावी असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी केले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.ते शहरी आणि ग्रामीण भागात रोज विविध ठिकाणी बैठका तसेच प्रचार सभा घेत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी ग्रामीण भागातील कणबस येथे कॉर्नर बैठक घेतली यावेळी तेथील जनतेने त्यांचे जोरदार स्वागत केले. महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना अत्यंत चांगली आहे यामुळेच भाजप सरकारचा विजय होईल असा आशावाद येथील महिलांनी व्यक्त केला
कणबस येथे कॉर्नर बैठकप्रसंगी
तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, नामदेव पवार,अंबिका पाटील,अतुल गायकवाड, प्रेम राठोड,सरपंच चंद्रकांत दुलंगे, लक्ष्मण किरणाळे, उदयकुमार जमा, प्रभुलिंग चिट्टे, सुरेश पाटील, गौरीशंकर बिराजदार,मल्लू चिवडशेट्टी, शिवानंद पुजारी,श्रीशैल कुताटे,यलप्पा भातांबरे, राहुल वंजारी, सागर धुळवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
रोहिणी नगर,जुळे सोलापूर येथे कॉर्नर बैठक घेत येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समवेत संवाद साधत मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. भाषणातील मुद्दे
सर्वांनी कमळ या चिन्हसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी आ. देशमुख यांनी केले.
यावेळी सुधाताई अळीमोरे ,संगीता जाधव,सुजाता सुतार,आनंद बिराजदार,महेश देवकर, संदीप हेसे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.