भाजप चा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंचे शक्तीप्रदर्शन
विकास कामे न केल्याने यंदा परिवर्तन अटळ – महेश कोठे
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली, असून रोज विविध भागात पदयात्रा काढून ते मतदारांना साद घालत आहेत,दरम्यान गुरुवारी भाजप चा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्यांनी भव्य पदयात्रा काढला, दत्त चौक येथून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली,दरम्यान ठीक ठिकाणी महेश कोठेंचे हार घालून स्वागत करण्यात आलं,ढोल ताशांच्या तालावर हि पदयात्रा मार्गस्थ झाली.
दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महेश कोठे म्हणाले की 20 वर्षात काहीच काम न केल्याने मालकांचे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम करत असून विकासाच्या मुद्द्यावर त्यांना बोलताच येत नाही,त्यामुळे यंदा शहर उत्तर मध्ये परिवर्तन अटळ असल्याचं कोठे यांनी सांगितले.
या पदयात्रेत उदय चाकोते,संजय शिंदे,राजू कुरेशी,प्रथमेश कोठे,सरफराज शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, दत्त चौक येथून सुरू झालेली हि पदयात्रा माणिक चौक,विजापूर वेस,बाराइमाम चौक,शंकरलिंग मंदिर,सोमवार पेठ, साखर पेठ,औद्योगिक बँक,कन्ना चौक मार्गे कोंतम चौक येथे पदयात्रेची सांगत झाली.