सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी हॅट्रिक सादर विजय संपादन केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव केला विजयाच्या अपेक्षेने मैदानात उतरलेल्या सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांना या निवडणुकीत तोंडघशी पडावे लागले आहे.
आमदार सुभाष देशमुख यांनी या निवडणुकीत मागील दहा वर्षाच्या विकासाच्या जोरावर आपला प्रचार केला विरोधातील कुणावरही त्यांनी टीका केली नाही जितके समोर जास्त उमेदवार येतील तेवढा फायदा देशमुखांना होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.