सोलापूर – भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख ११ व्या फेरी अंती ३० हजारांच्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. विजयकुमार देशमुख यांनी गेल्या २० वर्षात विकास कामे केली. जनतेशी नाळ जपण्याचे काम देशमुखांनी केले. गेल्या ४ टर्म मध्ये केलेल्या कामाचा हा पाचव्यांदा विजय असून हा सोलापुरातील जनतेचा हा विजय आहे.
सोलापूरचा विजय म्हणजे विजय देशमुख हे समीकरण झाले आहे. विजयकुमार देशमुखांच्या विजयात सोलापूरच्या प्रत्येक जनतेने मानाचा तुरा रोवला आहे. अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली.