सोलापूर,( प्रतिनिधी):- अवघ्या काही दिवसावर आलेल्या आषाढी वारीत काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सहभागी होणार असल्याचे समजले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही वारीला येणार असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिणेची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी एकादशीला मोठी यात्रा गेल्या अनेक वर्षापासून भरत आहे संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव, संत गजानन महाराज, संत जनाबाई अशा सर्व संताच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांसह येत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारीत सहभागी होण्या ची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा प्रशासन जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणा तयारीला लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्यात एका पालखीसोबत पायी चालत येणार आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे देखील वारीत सहभागी होणार असल्याचे काँग्रेस पक्षाकडून यापूर्वीच सांगण्यात आले होते, यंदा होत असलेला पाऊस आणि वारकऱ्यांची गर्दी तसेच नेत्यांच्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्यावर मोठा ताण येणार असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी वारकरी तसेच नेत्यांच्या दौऱ्या साठी चे नियोजनाची तयारी सुरू केली आहे अद्याप अधिकृत दौरा आलेला नसला तरी प्रशासनाकडून मात्र तयारी सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more