सोलापूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती यामध्ये राज्यातील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊनही नियुक्तीपत्र मिळाले नव्हते. यासाठी उमेदवार प्रशासनाकडे आणि शासनाकडे पाठपुरावा करत होते. दरम्यान, जिल्ह्यातील काही उमेदवारांनी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्या मागणीचे निवेदन सादर केले त्यावर तत्परता दाखवून पालकमंत्री पाटील यांनी या संदर्भातील योग्य ते आदेश संबंधित खात्याला दिल्याची माहिती आज मंगळवारी देण्यात आली.
माऊली पवार यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे पर्यवेक्षक उमेदवारांनी कृतज्ञता म्हणून पवार यांचे आभार मानले यावेळी पवार यांनी हे माझे नैतिक कर्तव्य असून केवळ एका जाती धर्मासाठी मी बांधला गेलेला नाही तर समाजातील कोणत्याही घटकासाठी मी सदैव तत्पर राहीन असे भाष्य केले.
यावेळी उमेदवारांनी आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करून येथून पुढे समाजासाठी त्यासोबत प्रत्येक वंचित घटकासाठी सरकारच्या माध्यमातून कार्यरत आहे असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी शिवाजी चापले, दादा सुरवसे, अजित बनसोडे, रोहित भोसले आदी उपस्थित होते.निलेश पवार , भालचंद्र शिंगाडे, स्वानंद घेवारे, अमोल भिसे, अमोल गोरे, अभिजीत मासाळ यांच्यासह उमेदवार याप्रसंगी उपस्थित होते.