सोलापूर प्रतिनिधी –
राज्यातील सत्ताधारी आघाडी असलेल्या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षाचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी एका ठेकेदाराला एका प्रकल्पासाठी 15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे,असे धमकावत मारहाण केल्याचा आरोप आहे. मनीष काळजे यांनी या ठेकेदाराकडून 11 लाख रुपये मागितल्याचे समजते. सत्ताधारी गटातील शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या मनीष काळजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.