सोलापूर प्रतिनिधी : Manish Kalje On Praniti Shinde
राज्यातील सत्ताधारी आघाडी असलेल्या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षाचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी एका ठेकेदाराला एका प्रकल्पासाठी 15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे,असे धमकावत मारहाण केल्याचा आरोप आहे. मनीष काळजे यांनी या ठेकेदाराकडून 11 लाख रुपये मागितल्याचे समजते. सत्ताधारी गटातील शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या मनीष काळजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ह्यावर खुलासा करताना मनीष काळजे म्हणाले …👇👇
काल रोजी माझ्यावरती एक गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची सविस्तर माहिती अशी की. संबंधित आकाश कानडे हा कॉन्ट्रॅक्टर असून तो ब्लॅकलिस्टेड आहे. या व्यक्तीला याआधी कधी मी भेटलोय नाही आणि कधी बोलणंही झालेलं नव्हतं परंतु दोन दिवसांपूर्वी तो माझ्या संपर्का कार्यालयामध्ये आला होता . येण्यापूर्वी त्याने स्वतःहून फोन देखील केलेले आहे त्याचा रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे.आणि एमआयडीसी मध्ये विकास निधी जो शासनाकडून मी आणलेला आहे ते काम मला करण्यास मिळावा असं सांगितलं. मी त्याला सांगितलं की ओपन टेंडर आहे या संदर्भामध्ये जे क्वालिफाईड होतील ज्या कंपनी चांगल्या पद्धतीचं तिथं काम करेल असा अधिकाऱ्याला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही टेंडर ही प्रक्रिया होईल यामध्ये माझा कसलाही रोल नाही. परंतु माझं म्हणणं आहे की काम हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे याकरिता मी त्याला सांगितलं.. आणि तो ऑफिसमध्ये दोन तास माझ्या समवेत होता . यावेळी त्याच्यासोबत झालेले बोलणे हे ऑडिओ वित रे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे.आणि चहा घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी अधिकाऱ्यांना सांगून त्याला क्वालिफाईड करावं आणि ते काम त्याला मिळवून द्या असे तो मला सांगितला परंतु मी त्याला स्पष्ट नकार दिला.आणि ते काम न करता मला दुसरा कोणतही काम करता येईल असं सांगून तो निघून गेला… परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी 11 च्या सुमारास मी महानगरपालिका मध्ये कामानिमित्त गेलो असताना त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला मी सांगत होतो की .जी कंपनी क्वालिफाईड आहे आणि ज्या कंपनीकडून चांगल्या पद्धतीचे काम होईल. ज्या कंपनीचे वर्क डन आहे याची खातरजमा करा व त्या कंपनीला वार्निंग देऊन चांगलं काम करून घेणे हे आपली जबाबदारी आहे. असे बोलत असताना तिथे आकाश कानडे नामक कॉन्ट्रॅक्टर बसला होता .आणि तो संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालत होता की माझी कंपनी तुम्ही क्वालिफाइड करा आणि मलाच ते काम द्या. अन्यथा माझे साहेब अधिकारी डेंगळे पाटील हे बघून घेतील. आणि माझे फायनान्सर शरद तांदळे ला सांगून या मनीष काळजे यांना बघून घेतो. या संदर्भामध्ये मी सांगितलं की हा जो काही निर्णय असेल किंवा ते टेंडर प्रक्रिया असेल ही अधिकारी आणि आपण ते पाहून घ्यावं असं म्हणून मी तिथून निघून गेलो…
आणि त्यानंतर काही वेळाने मला समजले की तो माझ्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे… यानंतर मी डीसीपी कबाडे साहेब यांना फोन केला मात्र ते फोन रिसीव केले नाहीत.आणि सदर बाजार पोलीस स्टेशनचे पीआय लकडे साहेब यांना संपर्क साधला आणि विचारणा केली असता. पी आय लकडे यांनी माहिती दिली की मी त्याला पैशाची मागणी करून मारहाण केलं आहे यावरती मी त्यांना विनंती केली की संबंधित एरियातला सीसीटीव्ही फुटेज आपण तपासावा आणि मी त्याला कधी पैशाची मागणी केली याचा तपास व्हावा याची मागणी केल्यानंतर माझ्या कार्यालयातील देखील सीसीटीव्ही फुटेज हे मी पोलिसांना सुपूर्द केले जे सीसीटीव्ही फुटेज हे ऑडिओ विथ व्हिडिओ आहेत. यामध्ये कुठेही मी त्याला मारहाण किंवा पैशासाठी दबाव असं केलेलं नाही. मी त्याबद्दलविनंती केले की या प्रकरणांमध्ये शहानिशा करून आमचे म्हणणे ऐकून या संदर्भात कारवाई करावी परंतु.. पीआय लकडे साहेब यांनी सांगितलं ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मला दबाव आहे आपण एकदा डीसीपी कबाडे यांना भेटावं… मी त्यानंतर पुन्हा डीसीपी कबाडे यांना फोन केला परंतु कबाडे यांनी माझा फोन घेतला नाही.
गेल्या तीन महिन्यांमध्ये आजपर्यंत माझ्यावरती तीन गुन्हे दाखल झालेले आहेत.. पहिला गुन्हा हा कारच्या व्यवहारा संदर्भातल्या पैशाच्या व्यवहारावरून माझ्यावर दाखल करण्यात आला रात्री 12 वाजता .
दुसरा गुन्हा हा अतिक्रमण असलेल्या हॉटेल चालकाला मी मारहाण केली अशा आशयाचा गुन्हा दाखल करण्यात आला रात्री 1 वाजता .. आणि हा आता खंडणी व मारहाण याचा नव्याने तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.. मला या बाबतीमध्ये महत्त्वाचा खुलासा करावयाचे आहे.. *पहिल्या गुन्ह्यामध्ये कसलेही एव्हिडन्स नसताना माझा संबंध असताना माझ्या बदनामीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला .तपासामध्ये मी त्यात दोषी नसल्याचा आढळून आलेला आहे. *दुसऱ्या गुन्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी चे सीसीटीव्ही मध्ये मी मारहाण केल्याचे दिसत नाही किंवा मी केलेलं नाही याची खातरजमा करून तो गुन्हा हा खोट्या स्वरूपाचा आहे असे दाखवून तो
ब फायनल करण्यात आला. आणि परत हा तिसरा गुन्हा हा माझा स्टेटमेंट न घेता माझी विचारपूस न करता कसलेही एव्हिडन्स नसताना माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे…
यामध्ये प्रामुख्याने हा गुन्हा दाखल करण्यासाठी नेहमी फिर्यादीला व संबंधित पीआय आणि पोलिसांना आदेश करणारे सोलापूरचे डीसीपी कबाडे हे आहेत.. डीसीपी कबाडे यांनी वारंवार माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करून माझं राजकीय करियर संपवण्याचे सुपारी घेतली आहे. डीसीपी कबाडे हे जाणून बुजून माझ्यावरती गुन्हे दाखल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत… डीसीपी कबाडे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बाजूने यंत्रणा वापरली व अशा पद्धतीचे गुन्हे दाखल हे त्यांनी केले… या संदर्भामध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्याविरुद्ध कबाडे आणि त्यांचे वसुलदार गायकवाड यांच्या विरोधात मी स्वतः निवडणूक आयोग आणि निवडणूक नियंत्रण अधिकारी कलेक्टर साहेब यांना मी पत्र दिलेलं होतं.. या गोष्टीचा राग मनात धरून नेहमी मला व माझ्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून बदनाम करण्याचा कार्य ते करत आहेत. त्यांचे वसुलदार गायकवाड देखील या संदर्भामध्ये त्यांची साथ देतात. त्यांच्या वसूलदार मला भेटून काँग्रेसला सहकार्य कर. आणि कबाडे साहेब म्हणतील ते ऐक असे सांगितले परंतु मी त्यांना विरोध केला.. त्यानंतर मी कबाडे साहेबांना स्वतः भेटलो आणि माझ्यावरती का खोटे गुन्हे दाखल करता या गोष्टीची आपण शहानिशा करा अशी विनंती केली असता. त्यांनी मला सांगितलं की तुझ्यासारखे अनेकांची मी मस्ती उतरवली आहे नांदेडच्या तुमच्या आमदार हेमंत पाटलांना विचार मी त्यांना काय केलं आहे.. मी तुला बघून घेईन अशा शब्दात मला सुनावलं… वास्तविक पाहता मी कसलाही गुन्हेगार नाही किंवा दोन नंबर धंदे करणारा नाही. एक सामान्य घरातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने समाजसेवा करतो गेल्या दोन वर्षापासून मी शहर मध्य मध्ये विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून. करोडो रुपयाचा निधी आणून विकास काम करतोय. हे विरोधकांना रुचत नसल्यामुळे . काँग्रेसच्या खासदार आणि त्यांचे पिता माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डीसीपी कबाडे यांच्या माध्यमातून मला त्रास देण्यास सुरुवात केली… डीसीपी कबाडे यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीचा राग .त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे या घटना माझ्यावर वारंवार होत आहेत… सत्य परिस्थिती पडताळून मी जर त्यामध्ये दोषी असेल तर माझ्यावरती योग्य ती कारवाई व्हावी मी त्यास पात्र राहील परंतु. ज्याप्रकारे माझ्यावर अन्याय होत आहे. माझी नाहक बदनामी करण्यात येत आहे मला मानसिक त्रास माझ्या परिवाराला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न डीसीपी कबाडे करत आहेत….
डीसीपी कबाडे यांच्या सांगण्यावरून पीआय लकडे व एपीआय ढवळे यांनी एक महिन्यांमध्ये माझ्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल केलेला असून . माझ्या व माझ्या परिवाराला डीसीपी कबाडे यांच्यापासून जीवाला धोका आहे माझ्या व माझ्या परिवाराचे काही बरे वाईट झाल्यास त्या संपूर्ण जबाबदारी डीसीपी कबाडे राहतील…यासंदर्भामध्ये मी माझ्या न्यायासाठी सन्मा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून… डीसीपी कबाडे यांची चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना मी व माझ्या परिवाराकडून केलेली आहे…
तरी माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा धादांत खोटा स्वरूपाचा आहे.. डीसीपी कबाडे जाणून बुजून हे सगळं करत आहेत. डीसीपी कबाडे यांचे निलंबन होऊन त्यांची चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अशी प्रतिक्रिया मनीष काळजे यांनी दिली आहे.