सोलापूर प्रतिनिधी –
प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना नोटांचा हार घालून आंदोलन करण्यात आले.
सिव्हिल सर्जन सुहास माने (Suhas Mane) यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार आस्थापनेवर नसलेले प्रयोगशाळा सहाय्यक यांची नियुक्ती अनेक लोकांच्या प्रतिनियुक्त्या मेडिकल फाईलच्या टक्केवारीचे प्रकरण या सर्व गोष्टींसाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला नोटांचा हार घालून पैसे घ्या आपण काम करा पैसे घ्या पण काम करा असे घोषणा देत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले सिव्हिल सर्जन सुहास माने तसेच उपसंचालक आरोग्य विभाग राधाकिशन पवार यांच्या विरोधाची घोषणाबाजी करण्यात आली.