सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर जिल्हा Solapur District बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेरडरेशन चा खेळाडू पंचाक्षरी लोणार Panchakshari Lonar याने मालदीव या ठिकाणी साऊथ एशियाबॉडी बिल्डिंग स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले . अशी कामगिरी करणारा तो जिल्हयातील पहिला खेळाडू आहे .
आज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद Kumar Ashirwad यांच्या हस्ते पंचाक्षरी लोणार चा सत्कार करण्यात आला .
सोलापूर जिल्ह्याचा बाॅडीबिल्डिंग खेळाडू पंचाक्षरी लोणार याने नुकतेच मालदीव येथे संपन्न झालेल्या साऊथ एशिया स्पर्धेत 70 कि गटात गोल्ड मेडल प्राप्त केले होते अनेक राष्ट्रीय स्पर्धेत लोणार ने गोल्ड मेडल जिंकले आहे .आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हे पहिलेच पदक प्राप्त प्राप्त करून भारताला 70 किलो गटात गोल्ड मेडल प्राप्त करून दिले होते त्याबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी पंचाक्षरी लोणार यांची खूप आस्थेने विचारपूस केली या यशापर्यंतचा संघर्ष जाणून घेत लोणारच्या यशाबद्दल अभिनंदन करून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला …
पंचाक्षरी लोणारने मिळवलेले साऊथ ऐशिया गोल्ड मेडल हे अतिशय प्रतिकूल परिस्थित मेहनत परीश्रम आणि कष्टाच्या जोरावर देशासाठी मिळवलेला हा सन्मान आहे – कुमार आशिर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर
याप्रसंगी बॉडी बिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार सरचिटणीस विशाल गायकवाड , युवानेते जुबेर बागवान , उपाध्यक्ष संजय हिरेमठ , प्रमोद भोसले , गणेश बासुतकर आलमेराज आबादीराजे सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते .