ड्रग्ज, अंमली पदार्थांच्या विक्रीवर आणि नशा करणाऱ्यांवर कारवाई करावी, जय हिंद लोक चळवळीचे सुमित भोसले यांची मागणी
पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांना देण्यात आले निवेदन
सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर ,नाशिक ,पुणे ,मुंबई,संभाजी नगर सारख्या जिल्ह्यांमध्ये ड्रगस व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मागील काही महिन्यांमध्ये पुणे,नाशिक, मुंबई,संभाजी नगर, सोलापूर आदी प्रमुख शहरांमध्ये ड्रगस् चे साठे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. या शहरामध्ये ड्रगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सापडल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत महाविद्यालयीन तसेच अल्पवयीन मुले देखील ड्रगच्या विळख्यात सापडल्या मुळे आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत. असे प्रकार सोलापुरात घडू नये यासाठी पोलिसांनी वेळेतच ड्रग सप्लायर यांचा तातडीने बंदोबस्त करावा अश्या मागणीचे निवेदन जिल्हा समन्वयक सुमित भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली जयहिंद लोकचळवळ सोलापूर शहर – जिल्हयाच्या वतीने पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांना देण्यात आले. यावेळी मा आयुक्त साहेब यांनी ड्रग आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल तसेच त्याची नशा करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करणार येईल असे आश्वासन दिले जयहिंद लोकचळवळच्या पदाधिकाऱ्यांनिही अशा गोष्टींवर लक्ष ठेऊन अमली पदार्थ किंवा ड्रग्स कोणी विकत किंवा बाळगत असेल, त्याची नशा करीत असेल ते पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी जयहिंद लोक चळवळ सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक सुमित भोसले, बहुमोल अवताडे, अनिरुद्ध दहीवडे, अमोल कोटगोंडे, राजू आनंदकर , किरण पाटील यांची उपस्थिती होती.