India Win T20 World Cup
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकून क्रिकेट विश्वात मानाचा तुरा रोवला आहे. टीम इंडियाने 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषक आपल्या नावे केला. चक्री वादळामुळे टीम इंडिया तब्बल पाच दिवसांनी आज भारतात दिल्लीमध्ये दाखल झाली. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे.
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मोदींनी भारतीय संघाला फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन भारतीय संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले होते. दरम्यान भारतीय संघ आज दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावर दाखल झाल्यानंतर ट्रॉफीसह मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय संघातील खेळाडूंचे मोदींनी कौतुक केले.