रावेर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या रक्षा खडसे यांना केंद्रातील मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आल्यानंतर त्यांना गहिवरून आले. त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि शपथविधी सोहळ्यासाठी एकनाथ खडसे कुटुंबासह उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी आज सांयकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. मोदींच्या मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मोंदीच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला मानाचं पान मिळणार असल्याचे दिसते.