Prime Minister Oath Ceremony 2024 |आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते.
देशात झालेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने २९२जागा जिंकल्या आणि बहुमताचा आकडा पार केला तर भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत.
राष्ट्रपती भवनात रविवारी संध्याकाळी ७.१५ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.