सोलापूर प्रतिनिधी –
गुळवंची(ता.उत्तर सोलापूर) येथील पशुपालक विष्णू भजनावळे यांना त्वरित भरघोस आर्थिक मदत द्या.
आमदार यशवंत माने yashwant Mane यांची पावसाळी अधिवेशनात मागणी.
गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या जवळपास 24 म्हशींचा मृत्यू झाला आहे . हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्यांच्या म्हशी ची तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थातून केली जात आहे.
मोहोळ मतदार संघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील पशुपालक विष्णू हरिदास भजनावळे या पशु पालकाच्या सायंकाळच्या वेळेस 28 पैकी 24 म्हशींचा पाण्यात विजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे .त्या पशुपालक असलेल्या विष्णू भजनावळे यांना सध्याच्या बाजारमूल्य प्रमाणे जास्तीत जास्त आर्थिक मदत शासनाच्या वतीने त्वरित द्यावी. तसेच, टाकळी सिकंदर(ता.मोहोळ) येथील श्रेया कापसे हिचा देखील विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबाला देखील शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी पावसाळी अधिवेशनात शुक्रवार रोजी केली आहे.