सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा.. प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केली तटकरे यांच्याकडे आग्रही मागणी
राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गटाचं एकच लक्ष… विधानसभा क्षेत्र… पदाधिकार्यांनी कामाला लागावे:- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
सोलापूर:-लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील महिला विकास मंडळ हॉल जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉईंट येथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांचा बैठक संपन्न झाली या बैठकीस महिला प्रदेश अध्यक्षा सौ रूपाली चाकणकर यांची देखील उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा देखील प्रदेशाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार पदी विजयी झाले या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष तथा नूतन खासदार सुनील तटकरे यांचा अस्सल सोलापुरी फेटा त्यावर राष्ट्रवादीचे चिन्ह आणि प्रदेशाध्यक्ष असे नाव असलेले फेटा बांधून भला मोठा हार घालून, सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला अहवाल त्यांना सादर केला. तसेच जाधवांनी सोलापूर शहर मध्य ची जागा ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने लढवावी अशी आग्रही मागणी केली निश्चितच शहर मध्य विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निश्चित यश मिळेल यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची तसेच घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांशी यासंदर्भात आग्रही मागणी करावी अशी मागणी देखील यावेळी किसन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी पक्षाचे सह कोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, सोलापूर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर, कोल्हापूरचे आदिल भाई फरास, माऊली जरग, सोलापूर राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवले, रमेश मुडीमाडाऊ, विनायक शिवशेट्टी आदींची उपस्थिती होती. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गर्जे यांचे विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याने त्यांचा देखील यावेळी किसन जाधव आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने त्यांना सोलापुरी शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांचा वाढदिवस नुकतेच पार पडला याचा देखील औचित्य साधून यावेळी चेतन नागेश गायकवाड आणि ईच्छा भगवंताची मित्रपरिवार यांनी सत्कार केला. दरम्यान यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे म्हणाले की नुकतेच राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्या यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली व महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. आता आपलं एकच लक्ष विधानसभा क्षेत्र यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावे महायुतीच्या कार्यकाळात अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात आला याचा नक्की आपणास विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी तटकरे यांनी दिल्या.