सोलापूर प्रतिनिधी –
जिल्हा प्रशासनाच्या वतीने उळे येथे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत
सोलापूर आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे पायी जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान यांची पालखी शेगाव येथून दिनांक 13 जून 2024 रोजी निघालेली आहे. श्रीचा हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या उळे ग्रामपंचायत हद्दीत आज सायंकाळी पोहोचला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहाने स्वागत केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, कासेगाव ग्रामपंचायतचे सरपंच यशपाल वाडकर, उळे ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती अंबिका कोळी यांच्यासह उळे परिसरातील विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.