Gautam Gambhir Team India Head Coach
टी २० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी आता गौतम गंभीर याची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटनंतर आता गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
Gautam Gambhir Team India Coach: BCCI ने टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ T20 विश्वचषकानंतरच संपला. त्यानंतर भारतीय संघ उत्तम प्रशिक्षकाच्या शोधात होता. 2011 चा विश्वविजेता गौतम गंभीर या शर्यतीत सर्वात पुढे होता. आता बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी गंभीरच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मुख्य प्रशिक्षकाची माहिती दिली.