सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली.सखल भागात पाण्याचा निचरा न झाल्याने घराघरांत पावसाचे आणि गटारीचे घाण पाणी शिरले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहे,मोदींचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सोलापुरात सायंकाळी अनेक नागरिक टीव्ही समोर बसले होते.पावसाने हा सोहळा पाहू दिला नाही,रविवारी सायंकाळी धुवाधार पावसाने जोरदार हजेरी लावली.नई जिंदगी परिसरात असलेल्या आनंद नगर भाग 1 मधील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले.संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
आनंद नगर भाग -१ मधील महिबूब नदाफ या ज्येष्ठ नागरिकाने माहिती देताना सांगितले,मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पाहायचा होता.सकाळपासून वाट पाहत बसलो होतो,परंतु हा सोहळा पाहणे माझ्या नशिबात नव्हते,पावसाचे आणि रस्त्यावरील घाण पाणी माझ्या घरात शिरले अशी खंत ज्येष्ठ नागरिक महिबूब नदाफ यांनी व्यक्त केली.