सोलापूर प्रतिनिधी –
14 जुलै रोजी बारामती येथे होणाऱ्या भव्य सभेला सोलापूरातून जाणार हजारो कार्यकर्ते- जिल्हाध्यक्ष संतोष पवार
उपमुख्यमंत्री अजितदादा आणि खा सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ….
राष्ट्रवादीच्या बैठकीत नियोजन –
14 जुलै रोजी बारामती येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची भव्य सभा होणार असून या सभेस राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्रिमंडळातील मंत्री पक्षातील सर्व आमदार उपस्थित राहणार असून सोलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकारी शहर कार्यकारिणी सर्व फ्रंटल व सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त या सभेस उपस्थित राहणार आहेत तसेच अजितदादा खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमाचे नियोजन करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरे होतील असे नियोजन करण्यात आले ही बैठक जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली नुकतेच सोलापूर शहर वक्ता सेल अध्यक्षपदी नागेश निंबाळकर तसेच वाहतूक सेल अध्यक्षपदी इरफान शेख व ओबीसीं शहर कार्याध्यक्षपदी बाबू पटेल यांची निवड करण्यात आली त्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी
जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी आनंद मुस्तारे बिज्जु प्रधाने युवक अध्यक्ष अध्यक्ष सुहास कदम प्रकाश जाधव नारायण मशाळकर अनिल बनसोडे राजू बेळेनवरू अमीर शेख अलमेराज आबादीराजे मारुती तोडकरी नागेश निंबाळकर आशुतोष नाटकर पवन पाटील सनी देवकते किरण शिंदे इरफान शेख संदीप माने विनायक रायकर बसवराज कोळी सुजित अवघडे अनिल छत्रबंध दशरथ शेंडगे सागर भोसले शामराव गांगर्डे तुषार जक्का पिंटू जक्का अमोल कोटीवाले सोमनाथ शिंदे महेश वसगढेकर अशपाक कुरेशी शाहिद शेख मिनाज बागवान आयुब शेख बाबू पटेल
महिला पदाधिकारी
महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम सायरा शेख युवती अध्यक्ष किरण माशाळकर प्रिया पवार कांचन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते .