सोलापूर प्रतिनिधी :
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील शेतकऱ्याला पोलिस असल्याचे सांगून तुमच्या मुलाविरुद्ध पोलिस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल आहे तुमच्या मुलाला घेऊन जायला आलो आहे.प्रकरण मिटवायचे असेल तर ५० हजार द्या अशी मागणी तोतया पोलिसांनी केल्याची घटना उघडकीस आली असून तोतया पोलिसांवर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रहीम इस्माईल सय्यद (वय ५४,रा. अक्कलकोट रोड, नळदुर्ग) यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जुनेद हबीबोद्दीन चंदा (रा. सोलापूर ) आणि मुनीर रियाज रंगरेज (रा. कुंभारी, दक्षिण सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या तोतया पोलिसांची नावे आहेत.ही घटना बुधवार (दि.१२) रोजी सायं साडे चारच्या सुमारास फिर्यादीच्या नळदुर्ग येथील शेतात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहीम इस्माईल सय्यद व त्यांचा मुलगा ताजोद्दीन सय्यद शेतात पत्रा शेडचे काम करीत असताना वरील दोन्ही आरोपी त्यांच्या शेतात आले व आम्ही जेलरोड पोलिस ठाणे येथून आले असून त्यातील जुनेद चंदा या व्यक्तीने पोलिस असल्याचे सांगितले व मोबाईलवरती फिर्यादीचा भाच्चा नवाज सय्यद याचा फोटो दाखविला व दूसरा आरोपी मुनीर रंगरेज यांच्या भाच्चीला रमजान महिन्यात तुमच्या भाच्याने छेडछाड केली आहे त्याच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आम्ही त्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तो कोठे आहे असे म्हणाले यातील आरोपी जुनेद शेख याने हे प्रकरण मिटवायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्यानंतर फिर्यादीने त्यांना ओळख पत्र मागितले त्यावेळेस वरील आरोपी उडवा उडवीचे उत्तर देऊ लागली त्यावेळेस फिर्यादी रहीम इस्माईल सय्यद वरील आरोपीना म्हणाले नळदुर्ग पोलिस ठाणे येथे चला वरील प्रकरणाची चौकशी करूयात पोलिस स्टेशनला आल्यानंतर कळाले की फिर्यादीच्या भाच्यावर कोणताच गुन्हा दाखल नाही व वरील दोन्ही आरोपी पोलिस ही नाहीत. आरोपी आहे.जुनेद हबीबोद्दीन चंदा (रा. सोलापूर ) आणि मुनीर रियाज रंगरेज (रा. कुंभारी, दक्षिण सोलापूर ) यांनी खोटे बोलून ५० हजार रुपयाची खंडनीची मागणी करून तसेच भाच्च्याला घेऊन जाण्याची धमकी दिली असून वरील आरोपीवर योग्य ती कारवाई करावी असे फिर्यादित नमूद आहे.याबाबतचा अधिक तपास नळदुर्ग पोलिस करीत आहेत.