man marathi news network,
सोलापूर बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी सेनेचे मनीष काळजे !
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करून शेतकऱ्यांसाठी काम करू ; मनीष काळजेंनी व्यक्त केला विश्वास
सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची नियुक्ती केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीष काळजे यांनी हे पत्र गुरुवारी मुंबईमध्ये घेतले आहे. दोनच दिवसापूर्वी बाजार समितीच्या प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु ते पदभार घेण्याच्या अगोदरच त्यांना शासनाच्या पणन विभागाने प्रशासकीय प्रशासक मंडळ म्हणून प्रशासकीय पदावर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचा आदेश काढला आहे. पणन विभागाने अचानक काढलेला हा आदेश राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे. यामुळे राजकारणातील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान मनीष काळजे यांच्या नव्या ईनिंगला या नव्या पदाने सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. आता बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून नव्या पदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशावाद टिकून असल्याचे यावरून दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करू आणि शेतकऱ्यांसाठी काम करू..
सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलावर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवून संधी दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या नव्या संधीचे नक्कीच सोने केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या नव्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेन , शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न यापुढे येणाऱ्या काळात राहणार आहे.