Solapur ST Bus Accident News Breaking | ST Driver Accident
सोलापूर प्रतिनिधी – दि. १९ जुलै
वैराग- पुणे एसटी बस क्रमांक एम.एच.१४ बी . टी. ०९७२ सदरची एसटी बस रोड वरून खाली घसरून पलटी झाली आहे. एसटी बसच्या चालकास हृदयविकारचा झटका आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पिंपळनेर या गावाजवळ ही घटना घडल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान बस पलटी होऊन वैरागचे अनेक प्रवासी हे जखमी झाले आहेत. सदर जखमींना कुर्डुवाडी इथल्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सदरच्या घटनेने आबालवृद्ध तसेच महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही काळाने इतर एसटी बसेस मागून प्रवाशांना इच्छितस्थळी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.