man marathi news,
Solapur Farmer News –
सोलापूर – मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात फळ बागा, फुलशेती वाढत आहे. कमी पाण्यात, कमी कष्टात अधिक उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे वळला आहे. पापरी परिसरातील सुमारे १५० एकर क्षेत्रावर गुलछडीची लागवड केली असून, पापरीची गुलछडी वाशी (मुंबई) येथील बाजारात १२० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. येथून दररोज सुमारे ५०० किलो गुलछडी विक्रीसाठी जाते. येथील शेतकरी खरबूज, कलिंगड, ढोबळी मिरची, काकडी, दोडका या वेलवर्गीय पिकांप्रमाणेच आता फुल शेतीकडे वळाला आहे. गुलछडीला एकरी सुमारे ४० हजारांपर्यंत खर्च येतो. त्यातून साधारण भाव असला तरी पाच ते सहा लाखांचे उत्पादन मिळू शकते. सण, समारंभात दरात वाढ होते.
गुलछडी लागवडीसाठी एकरी ३० कंद लागतात. एक कंदाची पिशवी १५०० रुपयांची आहे. चार फूट आकाराच्या बेडवर लागवड केल्यास त्याचे लवकर उत्पादन सुरू होते. लागवडीनंतर तीन महिन्यांत माल विक्री योग्य होतो. एकदा लागवड केली तर तीन वर्षांपासून रोपे उत्पादन देऊ शकतात.
• मी १ एकर जमिनीत गुलछडी लागवड केली आहे. रोज सरासरी ३० ते ४० किलो गुलछडी निघते. मार्केट मध्ये गुलछडी ला १५० रुपयांपर्यंत भाव मिळतो. एक एकर लागवडीतून मला वर्षाला ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कमी खर्चा मध्ये जास्त उत्पन्न गुलछडी देते म्हणून शेतकऱ्यांनी ह्याची शेती करावी असे आवाहन शेतकरी पांडुरंग भोसले यांनी केले आहे.