सोलापूर / Solapur
जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्र सरकार चा निषेध.
सोलापूर प्रतिनिधी :
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या काळात जम्मू काश्मीर मध्ये अक्षरशः आठवड्याला सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला होत असून त्यामध्ये सैनिकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी जात असून या प्रकाराला केंद्र सरकार मधील गृह खाते जबाबदार असून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने प्रताप चव्हाण दत्ता वाणकर महेश धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निषेध आंदोलन पार पाडले या प्रसंगी भारत माता की जय. गृहमंत्री हाय हाय. गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या. शिवसेना जिंदाबाद. उद्धव ठाकरे जिंदाबाद. अशा प्रकारच्या घोषणा देऊन गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब गायकवाड. रेवन पुराणिक. संदीप बेळमकर .विजय पुकाळे. अमित भोसले. कृष्णा भाऊ सुरवसे. ओंकार चव्हाण. संतोष सुपाते. राजेश केंबळे. जर्गीस मुल्ला. सनी पवार. सागर चव्हाण. अमित भोसले. समर्थ चुंबळकर. शुभम घोलकी. सचिन कोटे. योगेश बेळमकर. आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.