man marathi news,
सोलापूर प्रतिनिधी –
दुर्मिळ पक्षी म्हणून गणला जाणारा ‘माळढोक’ आता दिसणेही दुर्मिळ झाले आहे. मागील वर्षभरात कुठेतरी एक दिसल्याची नोंद झालेला माळढोक यंदा दिसलाच नाही. त्यामुळे माळढोक नावाने ओळखल्या जाणाऱ्या नान्नज अभयारण्यातील माळढोक नामशेष होतो की काय? शिवाय महाराष्ट्रातून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. साधारण १९७९ मध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज परिसरात माळढोक पक्षी दिसला. त्यानंतर राज्यातील पहिले माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज येथे १९८५ मध्ये घोषित झाले. देशात कच्च ( गुजरात), राजस्थान व नान्नज (उत्तर सोलापूर) येथे माळढोक पक्षी अभयारण्ये आहेत. माळढोक पक्षी हा दुर्मिळ पक्षी म्हणून ओळखला जातो.
जगात केवळ भारतातच ‘माळढोक’
शहामृगापेक्षाही छान व डौलदार माळढोक पक्षी दिसतो. शहामृग पक्षी आफ्रिकेत तर माळढोक पक्षी केवळ भारतातच आढळतो. माळढोक भारतातील उडणारा सर्वाधिक वजनदार पक्षी आहे. भारतात मोठ्या संख्येने आढळणारा ‘माळढोक’ शिकार झाला असल्याचे वन्यजीव विभागाने म्हटले आहे.
माळढोक दुर्मिळ होण्याचे नेमके कारण काय ?
माळढोक पक्षी हा मुळात वर्षाला एकच अंडी घालतो. ह्यांची प्रजनन क्षमता अगदी कमी असते. ह्या व्यतिरिक्त लोकसंख्या वाढीमुळे जी घटती माळराने आहेत शहराच्या आजूबाजूला असणारे पडिक माळरान या ठिकाणी प्लॉयटींग चे प्रमाण वाढत चाले आहे. मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. मुळात ह्या पक्ष्यांचा आदीवास माळरान, गवताळ परिसर आहे. आणि हा पक्षी वर्षातून एकच अंडी घालतो आणि त्या अंड्याचे संवर्धन आणि संरक्षण प्रचंड अडचणी निर्माण होतात. वन जीव, प्राणी आणि आणखी काही घटकांमुळे ती अंडी नष्ठ होतात.त्यामुळे त्यांची संख्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळते.
भारतात माळढोक पक्षी कुठे आढळतात?
भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये माळढोक पक्षी आढळून येतात. महाराष्ट्रात मुखतः सोलापूर तसेच चंद्रपूर, नागपूर ह्या परिसरामध्ये देखील हा पक्षी आढळून येतो.
माळढोक पक्षी शेवटचा कधी दिसला होता?
सोलापुरात गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये एका माधा माळढोक पक्षी दिसून आल्याची माहिती पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी दिली आहे. हा पक्षी सातत्याने आपली जागा बदलत असतो. तो एका ठिकाणी जास्त दिवस आपला आदीवास करत नाही.
माळढोक हा एक रुबाबदार, डौलदार पक्षी आहे. त्याला माळरानाचा राजा असेही म्हणतात. निसर्गातील सर्व घटक मानवाशी निगडीत व मानवाच्या कल्याणासाठी आहेत. त्या मुळे ह्या माळढोक पक्ष्यांचे संवर्धन आणि जतन करणे. आणि ज्या ठिकाणी हा पक्षी आढळून आल्यास सोलापूर वनविभागास संपर्क करावा असे आवाहन पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी केले आहे.