सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर : सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या सोरेगाव जवळ तळ्याच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या सुमारास कारच्या प्रकाशात शेतामध्ये बिबट्या दिसत आहे कार तशी जवळ जाईल तसे बिबट्या ते पाहून शेतात आत मध्ये निघून जातो. असा तो व्हिडिओ आहे. वन विभागाकडून या व्हायरल व्हिडिओ बाबत अद्यापही कोणते स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
सोशल मीडियावर व्हिडिओसह फिरत असलेला मेसेज खालील प्रमाणे सावधान आज सोरेगाव तळ्याच्या भागांमध्ये दोन बिबट्या दिसलेले आहे त्यामुळे प्रत्येक जण सतर्क राहावे आपल्या भागातील सर्व रहिवाशांना कळविण्यात यावे.