man marathi news,
Solapur / सोलापूर
मुख्यमंत्र्यांना वाघ नक बघायला वेळ आहे;विशाळगडला जायला वेळ नाहीय का?
एमआयएमचा संतप्त सवाल
एमआयएमच्या मूक मोर्चा रद्द करुन शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने दिले निवेदन
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर शहर आणि जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयएमच्या AIMIM वतीने विशाळगड प्रकरणात शुक्रवारी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विशाळगडवर असलेल्या अतिक्रमण प्रकरणावरून गजापूर येथील अल्पसंख्याकावर समुदायावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर एमआयएमच्या वतीने मूक मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते.सोलापूर शहर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ,कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शांततेत जाऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन दिले.एमआयएमचे पदाधिकार्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde) ,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सातारा येथे जाऊन वाघ नके पाहण्यासाठी वेळ आहे.विशाळगड आणि गजापूर येथे जाऊन पाहणी करण्यासाठी वेळ नाही.काँग्रेस पक्ष मुंबईत पत्रकार परिषद घेत आहे,विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मतदान कुणी केले
यावर काँग्रेसला पत्रकार परिषद घ्यायला वेळ आहे,मात्र गजापूर आणि विशाळगडवर काँग्रेस पक्ष देखील पत्रकार परिषद घेऊन बोलयाला तयार नाहीत अशी खंत एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला गेले आहेत. ही वाघ नख मुस्लिम कलाकाराने तयार केली होती.छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे या पुस्तकात इतिहासकार सरफराज शेख यांनी याबाबत सविस्तर माहिती नमूद केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनक तयार केलेल्या मुस्लिम कलाकाराच्या समाजावर विशाळगड येथील गजापूर येथे अन्याय केला जातो.अशी खंत एमआयएमच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केली.
विशाळगड आणि गजापूर या प्रकरणावरून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयएम पार्टीचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या वतीने शुक्रवारी दुपारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर बाजार पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बाधित होईल या अनुषंगाने मूक मोर्चाला परवानगी नाकारली. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने सोलापुरात शांतता अबाधित राहावी यासाठी मूक मोर्चा रद्द करत,शांततेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थित पोलीस आयुक्त यांना भेटून निवेदन दिले. विशाळगड आणि गजापूर प्रकरणावरन संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे पोलीस आयुक्त कार्यालयात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निवेदन देण्यासाठी आलेल्या मध्ये एमआयएमचे अझहर हुंडेकरी, गाझी जहागीरदार,नदिम डोनगांवकर मोहसिन मैंदर्गीकर, एजाज बागवान, रिझवान हवालदार , जुबेर शेख, अझहर कोरबु, अजहर जहागीरदार, नदीम डोनगांवजर,शोहेब चौधरी, अशपाख बागवान, फिरोज शेख, जावेद शेख, एजाज शेख, साहील शेख, सलमान शेख आदी उपस्थित होते.