Manoj Jarange Patil Solapur Sabha /
सोलापूर प्रतिनिधी –
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ७ ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात सोलापुरातून होत आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढत समाज बांधवांची मते जाणून घेत त्यांना गरजवंत मराठ्याचा लढा आणि प्रशासनामधील सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देणार आहेत.
याप्रसंगी पोलिस उपायुक्त विजय कबाडे, नगर अभियंता सारिका अकुलवार व मराठा क्रांती मोर्चा सोलापूरचे सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्यक्ष पाहणी करत पोलीस प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी, महापालिका सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.