सोलापूर प्रतिनिधी – श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि श्री संत जनाबाई यांच्या 674 व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त बाळीवेस येथील श्री संत नामदेव विठ्ठल मंदिरात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापुरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तोष्णीवाल परिवाराकडून गेल्या 24 वर्षापासूनची मोफत नाहीतर रोग तपासणी शिबिराची परंपरा आज देखील जोपासण्यात येत आहे. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या नेत्ररोग शिबिरामध्ये 300 पेक्षा अधिक गरजूंनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत, मुरलीधर रेळेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना मनीष केत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी गेल्या 24 वर्षांपासून अखंडरीत्या सुरू असलेल्या परंपरेबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी दक्षिण अमेरिकेतील डॉक्टर हानीअर आणि डॉ जॅमेल यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज नगरकर यांनी केले तर तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ.माहेश्वरी , बाळकृष्ण राशिनकर, नागेश राशिनकर, सचिन बारटक्के, चंद्रकांत जवंजाळ, वासुदेव सांडाळ, मनोज भस्मे, महेश बुरांडे, कृष्णा रेळेकर, साहिल पवार आदींनी परिश्रम घेतले आहेत.