man marathi news network,
सोलापूर प्रतिनिधी –
जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील डी. बी. पथकाने २४ तासाच्या आत सोनाराचे दुकानात चोरी करणाऱ्या नोकरास अटक करुन गुन्हा उघडकीस आणुन त्याच्या ताब्यातुन ०५ तोळे ०३ ग्रॅमचे सोने असा (३,८४,०००) रुपयांचा मुददेमाल हस्तगत करुन दमदार कामगिरी केलेली आहे.
सदर गुन्हयातील फिर्यादी सुप्रिया संगमेश्वर स्वंत वय ३५ वर्षे व्यवसाय सोनार व्यापार रा. ८७७/३५/१भवानी पेठ सिध्देश्वर हौसिंग सोसायटी सोलापुर, यांचे गुरुमहाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान ४१८ पुर्व मंगळवार पेठ सराफ कट्टा वारद बोळ सोलापुर येथे सोन्याचे दुकान आहे. त्यांचे दुकानात काम करणारा कामगार (आरोपी) नांमे विजय बालाजी कोंडा वय-३४ वर्षे व्यवसाय-सोनार कारागीर रा-लक्ष्मी नरसिंह झोपडपट्टी अशोक चौक सोलापुर याच्या विरोधात १६/०७/२०२४ रोजीचे पूर्वी फिर्यादी यांचे दुकानातील कपाटा मधुन सोन्याचे गंठण, नेकलेस, कानातील एअर रिंग असे एकुण ५ तोळे 3 ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरी केल्याने यातील फिर्यादी यांनी विजय बालाजी कोंडा यांचे विरुध्द वरील प्रमाणे गुन्हा दाखल केले होते.
जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी सदर गुन्हयातील आरोपी विजय बालाजी कोंडा याचा शोध घेवून कारवाई करणे कामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सपोनि/ पडसळकर यांना आदेशीत केले होते. तेंव्हा सपोनि पडसळकर यांच्या डी.बी. पथकास हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस खाजप्पा आरेनवरु यांना विश्वासनिय बातमी मिळाली की, आरोपी विजय बालाजी कोंडा हा कन्ना चौक येथील नागेश चहा कॅटींग जवळ चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने तेथे डी. बी. पथकाने जावून त्यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 3,84000 रुपयांचा वरील मुददेमाल हस्तगत करुन आरोपी विजय बालाजी कोंडा यास अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार साो, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे , सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलिस निरीक्षक शबनम शेख (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सपोनि पडसळकर व तसेच खाजप्पा आरेनवरु, शितल शिवशरण, विठ्ठल पैकेकरी, बसवराज स्वामी, स्वप्नील कसगावडे, दादासाहेब सरवदे, निलेश घोगरे, अभिजीत पवार, दत्ता काटे सावबर पोस्टे कडील प्रकाश गायकवाड, मच्छिद्रं राठोड यांनी पार पाडली आहे.