Bigg Boss Marathi New Season Day 11* : ‘बिग बॉस मराठी’च्या घराला अखेर पहिला कॅप्टन मिळाला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू-वालावलकरला पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरात निक्कीचीच चर्चा आणि हवा होती. पण आता अंकिता कॅप्टन झाल्याने यापुढे गेम चेंज झालेला पाहायला मिळेल.
भांडी घासण्याच्या ट्रॉमावरुन अंकिता प्रभू-वालावलकरला पहिल्या आठवड्यात प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. पण आता दुसऱ्या आठवड्यात हीच कोकणची चेडवा कॅप्टन झाल्याने तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या भागात अंकिता घरातील सदस्यांना कामे वाटताना दिसून येणार आहे. अंकिताने दिलेलं काम करण्यास घन:श्याम नकार देताना दिसून येईल.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात घन:श्याम अंकिताला म्हणतोय,”मला एकच कोणतं तरी काम दे”. त्यावर अंकिता म्हणतेय,”दोन कामे असतील तरी एकावेळी तुला एकच करायचं आहे”. त्यावर घन:श्याम वाद घालत म्हणतोय,”मला एकच काम दे”. अंकिता म्हणते,”एकावरच अन्याय नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मला घरात कमी भांडणे हवी आहेत.” आता घन:श्याम नक्की काय काम करणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा.