साताऱ्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Health) यांची शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. या शांतता रॅलीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे. शांतता रॅलीमध्ये मराठा बांधवाना संबोधित करत असताना घडला प्रकार, यामुळे मराठा (Maratha) आंदोलनाला मोठा फटका बसला आहे.
मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक खाली बसले. मनोज जरांगे पाटलांना उपचार घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.