सोलापूर प्रतिनिधी –
दिनांक 15 जून 2024 शनिवार रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान, बाळे येथील तोडकरी वस्तीत शैलेश कटके यांच्या घरात बाथरूम मध्ये एक साप निदर्शनास आला. वेळ न दवडता खटके याने WCAS चे सदस्य लखन भोगे यांना फोन केला. लखन भोगे सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे काही क्षणात तेथे पोहोचले. त्या ठिकाणी जाऊन पहिला असता एक कवड्या प्रजातीचा बिनविषारी साप साधारण अडीच फुट लांबीचा आपल्या भक्षाच्या शोधात खिडकीमध्ये बसला होता. अचानक जाळीमधून अजून एक दुसरा साप आम्हाला निदर्शनास आला. तो साप मण्यार प्रजातीचा अत्यंत विषारी साप साधारण तीन फुट लांबीचा होता.
◆ कवडा प्रजातीचा साप हा पालीच्या शोधात खिडकीपर्यंत पोहोचला होता आणि मन्यार साप कवड्या सापाला आपलं भक्ष करण्यासाठी खिडकीपर्यंत पोहोचला. कवड्या साप पालीला आपलं भक्ष्य करण्याच्या अगोदरच मन्यार सापाने त्याच्यावर झडप घातली. मन्यार सापाने त्या कवड्या सापाच्या पोटाला कडकडून पकडले. त्या मन्यार सापाची पकड एवढी घट्ट होती कि कवड्या सापाला जरा सुद्धा हलता येत नव्हते. हळूहळू तो मन्यार सापा त्या कवड्या सापाच्या तोंडापासून खाण्यास सुरुवात केली. एखादा साप जर आपले भक्ष खात असेल तर त्यात व्यत्यय आणणे चुकीची आहे. साधारण दीड तासात त्या मन्यार सापाने कवड्या सापाला गिळंकृत केले. WCAS च्या सदस्यांना हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये टिपता आला. मन्यार सापाने त्या कवड्या सापाला खाऊन झाल्यानंतर डब्ल्यूसीएयसचे सदस्यांनी अलगद असे मोठ्या बरणी मध्ये मन्यार सापाला बंद केले व काहीवेळातच त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवसात मुक्त करण्यात आले.
◆ या बचावकार्यात WCAS चे लखन भोगे, सुरेश शिरसागर, संतोष धाकपाडे यांनी सहकार्य केले.
वाईल्डलाइफ_काँझर्वेशन_असोसिएशन_सोलापूर