सोलापूर प्रतिनिधी –
होटगी रोड वरील सुरवसे प्रशालेमध्ये पुष्पवृष्टीने व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्या उज्वलाताई साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या पहिल्या महिला उपमहापौर डॉ. नसीम पठाण मॅडम व पोलीस एपीआय प्रदीप देशमुख यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा हस्ते सरस्वतीच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पालकांसमवेत पूजन करण्यात आले.
साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आली. यावेळी आपल्या मनोगतातून प्रमुख पाहुण्या डॉ. नसीम पठाण यांनी सर्वांनी खूप अभ्यास करून प्रथम येण्याचा मान मिळवावा असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्या साळुंके यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती काटिकर यांनी केले तर रंगनाथ चौखंडे यांनी आभार मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.