सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथील सामाजिक कार्यकर्त्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेचे महिला युवती जिल्हाध्यक्ष प्रा.वर्षा गायकवाड ज्यांनी आजतागायत अन्यायग्रस्त वंचित पीडित घटकांसाठी नेहमी लढा देण्याचे काम करत आले असून नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण करून न्याय मिळवून देण्याचे काम आजवर करत आले आहेत नुकतेच महिलांच्या सशक्तिकरणासाठी शालेय पाठ्यपुस्तकात सेल्फ डिफेन्स सारखे प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात यावे म्हणून सोलापूर जिल्हापरिषद येथे एकदिवसीय निदर्शने देत आंदोलन करण्यात आले होते. अश्या समाजातील विविध प्रश्नांवर आक्रमकपणे लढा देतानाच वर्षा गायकवाड यांच्या कामाची दखल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांची भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेच्या महिला युवती जिल्हा अध्यक्ष पदावरून पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख पदी पदोन्नती करण्यात आले आहे यामुळे प्रा.वर्षा गायकवाड यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महिलांच्या सशक्तिकरणासाठी नेहमीच लढा सुरू राहील – प्रा.वर्षा गायकवाड
सध्या देशभरात विविध ठिकाणी महिला लहान अल्पवयीन मुली यांच्या सोबत अत्याचार होताना एकतर्फी प्रेम प्रकरणातून हल्ला होताना अशे अनेक घटना घडताना दिसून येत आहेत महिलांचे सशक्तिकरण होणे गरजेचे आहे महिला ही सध्याच्या काळात फक्त घर संसार चालविणारी नसून देश देखील चालवू शकते आणि चालवत ही आहेत देशात विविध मोठ मोठ्या राजकीय शासकीय पदांवर महिला काम करत आहे आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला बरोबरीने काम करत आहेत असे असताना काही क्रूर आणि गुन्हेगारी वृत्ती असलेले समाजात टाकून दिलेले समाजकंटक ईसम महिलांवर मुलींवर अत्याचार करून त्यांची शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करण्याचे काम करताना दिसून येत आहेत आणि महिलांवरील अन्याय अत्याचार वाढताना दिसत आहे. तरी महिलांसाठी मी या नव्या जबाबदारीने नव्या उमेदीने नव्या ताकतीने उभे राहून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सशक्तीकरणासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन असे दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना प्रा.वर्षा गायकवाड यांनी भावना व्यक्त केल्या.