कृत्रिम पध्दतीने सापांची अंड्डी उबविण्यात वन विभाग सोलापूर विभागाला यश
घराच्या कंपाड भिंतीच्या फटीमध्ये आढळुन आली होती अंडी
सोलापूर – घटना सविस्तर दिनांक 17 जुलै रोजी वन विभाग रेसक्युअर प्रविण जेऊरे ह्यांना फोन वरुन माहिती मिळाली . रामवाडी परिसरातील वसीम जमादार ह्यांच्या कंपाऊंड भिंतीत अंडी आहेत. सदर अंडी सापाची वाटतात असे फोन वरुन शंका जमादार ह्यांनी व्यक्त केली.
घटनास्थळी जेऊरे , तेजस म्हेत्रे पोहचले असता अंडी सापाची असल्याचे समजले. परंतु कोणत्या साप जातीची आहेत हे समजणे खुप कठीण होते.
अंडी मनुष्य नजरेस पडल्याने धोका वाढला होता. एकुण सात अंडी होती. प्रविण जेऊरे ह्यांनी सुरक्षित फटीतून साती अंडी बाहेर काढली. भरणीत सुरक्षित ठेऊन त्यानी सिध्देश्वर वनविहार गाठले.
वनविहार मध्ये एका मोठ्या भरणीत वाळु,कचखडी ,पालापाचोळा, विटांचा चुरा ,माती मिश्रण करुन योग्य तापमान करून अंडी उबविण्यासाठी ठेवली.
दिनांक 6 ऑगस्ट रोजी तब्बल 21 दिवसानी साती अंड्यातून तस्कर जातीचे बिनविषारी सापाची पिल्ले बाहेर पडली.दिनांक 7 ऑगस्ट रोजी निसर्गात मुक्त करण्यात आले.
या साठी मा. उपवसंरक्षक सोलापूर श्री धैर्यशील पाटील साहेब, मा. सहा. वनसंरक्षक सोलापूर श्री बाबा हाके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर दीपक खलाने,श्री शंकर कूताटे वनपाल सोलापूर,श्री श्रीशैल पाटील वनरक्षक आणि प्रविण जेऊरे वनविभाग रेस्क्यूअर,शंकर दोरकर,विक्रम सरवदे, महेश तडवळकर वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य मुकुंद शेटे,तेजस म्हेत्रे यांनी काम केले आहे ..
नागपंचमी दोन दिवसावर असताना सापांचा सात पिल्लांना मिळालेल्या जीवनदान मुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
तस्कर साप(बिनविषारी)
वैशिष्ट्ये– तस्कर बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट(Trinket) म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप आहे. तस्करचा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा.हा साप शहरी भागात जास्त आढळतो.डिवचला गेला असता तोंड उघडून हल्ला करतो.दिवसा व रात्रीही आढळतो.
आढळ-मानवी वस्ती, उंदराचे बीळ,छोटी जंगले,अडगळीचे ठिकाण
खाद्य- छोटे उंदीर,पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडूक इत्यादी