Pune – महाराष्ट्रात गेल्या आठ तारखेपासून आम्ही दौरा करत आहोत. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ज्या भागा मध्ये आमदार आहेत. तेथील प्रश्न जाणून घेणं आणि सोडवणं अश्या अनेक गोष्टींवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे असे सर्व ह्या उपक्रमाच्या माध्यमातून चालू आहे.
हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, ह्याची कल्पना आशा ताईंना असेल. परंतु अश्या पद्धतीने काळे झेंडे दाखविण्याऐवजी त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे आल्या असत्या तरी दादांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतलं असते. असे म्हणत रुपाली चाकणकर म्हणाल्या मला वाटतं ही स्टंटबाजी आहे.
‘अजित दादा, कोणीही आलं तर नाव, गाव, जात, धर्म आणि पक्ष ही विचारत नाहीत. जो येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असे स्टंटबाजी चे प्रकार घडत राहणार आहेत. ह्याचे आम्हाला काय विशेष वाटतं नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.