Sangli –
मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलं? असे भाष्य संभाजी भिडे यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.
Sambhaji Bhide on Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी यावर भाष्य केले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर संभाजी भिडे म्हणाले की, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख केला. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये निःशुल्क प्रवेश दिला तर वाघ आणि सिंहानी तिथे प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? हा प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केला.