man marathi news,
Sharad Pawar On Ajit Pawar –
प्रतिनिधी – ‘बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यात कोणताही रस नाही’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं होतं. अजितदादा पवार यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे? मला माहिती नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अजित पवार काय म्हणाले होते?
बारामतीमधून जय पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर आपल्याला बारामतीतून निवडणूक लढविण्यात कोणताही रस नसल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. “स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि पक्षाच्या संसदीय समितीचा निर्णय असेल तर जय यांना उमेदवारी मिळू शकते,” असं अजितदादांनी सांगितलं होतं.
शरद पवारांनी काय म्हटलं?
याबद्दल पुण्यात प्रसारमध्यमांनी शरद पवारसाहेबांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारसाहेब म्हणाले, “सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते. त्यांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जिथे अनुकूल वातावरण वाटायला लागते, तिथे जनरली, असं करतात. अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे? मला माहिती नाही.”