सोलापूर प्रतिनिधी –
सालाबाद प्रमाणे लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व प्रशिक सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाचा वारसा जपत सलग ९ वर्षे मध्यवर्ती मिलिंद नगर बुद्धविहार येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराची सुरुवात भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करुण सामुदायिक बुद्धवंदना घेऊन करण्यात आली.
या वेळी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचा निळा फेटा घालून संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला,
यावेळी प्रमुख मान्यवरांनी संस्थेच्या वतीने पार पडलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रक्तदान हेच श्रेष्ठदान या युक्तिप्रमाणे गेली ९ वर्षे मानवतावादी दुष्टिकोनातुन रक्तदानाचा कार्यक्रम हाती घेत या शिबीरास २६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
संस्थेच्या वतीने रक्तदात्यास अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती..
सदर शिबिरास अतुल नागटिळक,संस्थापक सुशील सरवदे,
प्रा.पवन थोरात,नागेश रणखांबे,शशांक साबळे,विकास सरवदे,ब्रम्हा निकंबे,सादिक शेख,तात्या काळे,विजय सोनवणे,अमोल वामने,गोविंद तळभंडारे,बॉबी शिंदे,प्रबुद्धकुमार दोड्यानुर,उपगुप्त चौधरी,राहुल वाळके,सचिन कांबळे,अनिल बोराळे,किशोर इंगळे,समीर नदाफ,बापू सदाफुले,शेषकुमार सरवदे,श्रीनिवास सरवदे,दत्ता वाघमारे,मल्लु शिवशरण,आर बी दयावान,मंगेश शिरसे,अजय डीगोळे,आण्णा भालेराव,विशाल कांबळे,देवा बुधतवार,मनोज शेरला,रोहित शिरसाट,विशाल कांबळे,राहुल गाडे,आदर्श कांबळे,शिवा काटकर,निलेश सोनवणे,अनिल बोराळे,अजय गोतसूर्वे,अक्षय चंदनशिवे,सचिन धेपे,पिंटू रणदिवे,संतोष गायकवाड आदीची प्रमुख उपस्थिती होती.
तर शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे,अध्यक्ष श्रीशैल इंगळे,सुहास लोंढे,अजय बाबरे,मयुर सरवदे,भिमा बिडबाग,अतुल रोकडे,महेंद्र तळभंडारे,शशांक शेरला,मिलिंद शिवशरण,हरीश भोसले,शुभम शिवशरण,आपा गायकवाड,अनिकेत जगताप,रतन साळवे,सचिन बनसोडे,किशोर नागटिळक,विशाल कदम,निखिल सदर्गुद्दा,गौतम कावरे,कुणाल वाघमारे,दया अंतड,माया बनसोडे,स्वप्नील कसबे,नागेश भंडारे,बापू कापुरे,करण बाबरे,निशांंत बनसोडे,रोहन कांबळे,विराज सरवदे,आप्पा तळभंडारे,शैलेश राजगुरू,आदित्य बाबरे,अभिषेक जगझाप आदि सदस्यांनी परिश्रम घेतले,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवम सोनकांबळे तर आभार सुशिल सरवदे यांनी मानले…