सोलापूर : भगवान महर्षी श्री मार्कंडेय महामुनींच्या शताब्दी रथोत्सवानिमित्त धर्मरक्षक अंबादास आण्णा गोरंटला मित्र परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसातही या महाप्रसादाचा पंधरा हजार भाविकांनी लाभ घेतल्याचे अंबादास गोरंटला यांनी सांगितले.
सोलापूर शहर पोलीस मुख्यालयासमोरील शिवराम चौक येथे या महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यंदा रथोत्सवाचे शताब्दी महोत्सव असल्याने लाखो भाविक या रथोत्सवात सहभागी झाले होते. धर्मरक्षक अंबादास आण्णा गोरंटला मित्र परिवाराच्या आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान महासेवेमुळे अनेक भाविकांनी आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, ज्ञानेश्वर म्याकल, जगदीश कर्रे, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेवक देवेंद्र कोठे, पत्रा तालमीचे श्रीकांत घाडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, श्रीराम युवा सेनेचे राजकुमार पाटील, हिंदुराष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवि गोणे, शहर संघटक आनंद मुसळे, गोरक्षक विजय यादव, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, रविकुमार बोल्ली, महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे दत्तात्रय बडगू, भाजपचे सदानंद गुंडेटी, मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे, युवा नेते हणमंतू श्रीराम, धर्मजागरण समन्वय विभागाचे प्रवीण कोंडा, अमोल इंदापूरे यांच्याच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर राचर्ला, रवि भरत, विजय बडगू, विठ्ठल शेरला, नितिन मार्गम, निखिल इट्टम, राहुल कैरमकोंडा, सागर आडम, उदय रापोल, विजय गोणे, बालाजी कैरमकोंडा, अजय गोणे यांच्यासहअनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे निवेदन श्रीधर आरगोंडा यांनी केले.