सोलापूर प्रतिनिधी –
राजकीय व्देषातून नेतेमंडळींनी काही शेतक-यांची दिशाभूल केली आणि त्यांना एमआयडीसीला विरोध करण्यास प्रवृत्त केले.त्यामुळे एमआयडीसी रद्द झाली आहे.तरीही,आपण हार मानणारे नेते नसून मंद्रूप येथेच आपण नवीन एमआयडीसी मंजूर करून उभारणार आहोत.गेल्या दहा वर्षात आपण मतदारसंघाचा विकास केला असून यापुढे तालुक्याचा विकास आपणच साधणार आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली..
मंद्रूप येथील सीतामाई तलावात उजनीचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे त्यांची पाहणी आमदार देशमुख यांनी केले केले.यावेळी ते बोलत होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,नायब तहसीलदार जितेंद्र मोरे,
माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, गौरीशंकर मेंडगुदले, नितीन रणखांबे,मुत्या वाडकर, नागनाथ मेंडगुदले, अनिल जोडमोटे,म्हाळप्पा घाले,सिध्दू सिंदखेडे,शिवराज कालदे आदी उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले, गेल्या दहा वर्षांत आपण मतदारसंघात मजबूत रस्ते निर्माण केले आहे.यामुळे दळणवळण वेगाने होत आहे.सुलभ वाहतूकमुळे दूधाची वाहतूक सोपी झाली आहे.अनेक गावात वीज वितरण कंपनीचे सब- स्टेशन केल्याने वीजपुरवठा सुरळीत होत आहे.गावोगावी पाणीपुरवठा योजना राबविले आहे.गावात अंतर्गत रस्ते तयार केले आहे.मतदारसंघात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिले आहे.होटगी व नांदणी येथे पर्यटकस्थळ निर्माण केली आहे.वडकबाळ येथे ब्रीज कम बंधा-यांची बांधकाम सुरू आहे.मंद्रूप येथील सीतामाई तलावाचे सुशोभीकरण करून येथे पर्यटकस्थळ निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे.
मंद्रूप येथील एमआयडीसीला काही विघ्नसंतोषी नेतेमंडळींनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून आंदोलन करण्यास त्यांना भाग पाडले.त्यामुळे एमआयडीसी रद्द झाली आहे.येथील बेरोजगारी कमी होण्यासाठी या भागाचा चौफेर विकास आणि आर्थिक उलाढाल वाढण्यासाठी मंद्रूपला एमआयडीसी होणे गरजेचे आहे.यासाठी आपणच मंद्रूपला पुन्हा एकदा नव्याने एमआयडीसी मंजूर करून आणणार आहोत.शेतक-यांची संमती घेऊनच नवीन एमआयडीसी उभारण्यात येईल असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.