– बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने
– गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी
सोलापूर- बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शरद पवार गटाच्या वतीने पूनम गेटसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्या.
सोलापूर :
बदलापूर या ठिकाणी एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यामुळे देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. फडणवीस सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय, हाय आरोपीस फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
बदलापूर या ठिकाणी एका शाळेत तीन वर्षाच्या चिमुरडीवर त्या संस्थेतील सफाई कामगाराने अत्याचार केला. त्यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्यामध्ये भरदिवसा कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. खुन करणे, महिला, मुलीवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे असे कृत्य होवू नये म्हणून राज्य सरकारने त्या नराधमास कडक शिक्षा दिली पाहिजे. या घटनेचे पडसाद सोलापूरात उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून या घटनेचा निषेध नोंदवला.
हे आंदोलन महिला अध्यक्ष सुनिता रोटे, लता फुटाणे, वंदना भिसे, नसिमा शेतसंधी, सुनिता गायकवाड, गौरा कोरे, युवती अध्यक्ष प्रतिक्षा चव्हाण, सारीका नारायणकर, प्रेमलता कांबळे, उमा केत, गुलशन जमादार, नागणे , व्ही.डी. गायकवाड, प्रमोद भवाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.