सोलापूर प्रतिनिधी |
सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन व लोकमंगल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने 30 वि सिनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष) चे आयोजन लोकमंगल कॉलेज वडाळा येथे दिनांक 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान आयोजन केलेले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन 25 ऑगस्ट सकाळी १० वाजता होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या शुभहस्ते व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे अध्यक्ष रोहनजी देशमुख, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील राज्य सचिव प्रदिप तळवेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे
या स्पर्धेसाठी राज्यभरातील 30 जिल्ह्यातून 500 खेळाडू पंच प्रशिक्षक पदाधिकारी उपस्थित राहणार आहे
या स्पर्धेसाठी लोकमंगल कॉलेज मध्ये दोन मैदान तयार करण्यात आलेले आहेत तसेच या खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था लोकमंगल कॉलेजमध्ये केलेली आहे
या स्पर्धा साखळी व बाद या पद्धतीने होणार आहे या स्पर्धा सकाळी आठ वाजता सुरू होईल व सायंकाळी सहा पर्यंत चालेल
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या शुभहस्ते व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे अध्यक्ष रोहनजी देशमुख, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, राज्य सचिव प्रदीप तळवेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन व नियोजन संघटनेचे उपाध्यक्ष संतोष गवळी, सचिव संतोष खंडे, कोकाटे सर, मारुती घोडके, गंगाराम घोडके, प्रशात राणे, श्रीधर गायकवाड, प्रबुध्द चिंचोलीकर, प्रशांत कदम, शिवाजी वसपटे, राहुल अन्यापनवर करित आहेत.