सोलापूर प्रतिनिधी –
आमदार राजेंद्र राऊत यांनी योग दिन साजरा केला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आमदार राजेंद्र राऊत यांनी विविध योगासने करून योग दिन साजरा केला.
आपल्या धकाधकीच्या जीवनात शरीर स्वास्थ्य चांगले व निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास वेळ काढून योगसाधना व व्यायाम करावा, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील जनतेला केले. त्यांनी आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगताना, संपूर्ण जगाने योगसाधनेचे महत्त्व ओळखून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे नमूद केले.
आमदार राऊत यांनी सांगितले की, नियमित योगसाधना केल्याने शरीर तंदुरुस्त राहते तसेच मानसिक स्वास्थ्य देखील टिकून राहते. त्यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना योगसाधना व व्यायामाचे महत्त्व पटवून देत, आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले.