सोलापूर प्रतिनिधी – प्रसाद दिवाणजी
योगाच्या शास्त्रीय माहितीसाठी मल्टीमिडीया चित्रप्रदर्शन उपयुक्त- एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक तपनकुमार बंद्योपाध्याय यांचे प्रतिपादन
१० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी केंद्रीय संचार ब्यूरोचा विशेष उपक्रम क्यू आर कोड स्कॅन करा, योगाची संपूर्ण माहिती मिळवा
विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
प्रदर्शन दोन दिवस सर्वांसाठी खुले
सोलापूर दि. २०. आनंदी आणि आरोग्यमय जिवनासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आरोग्याची काळजी घेणेचे स्मरण करुन देतो. योगाच्या शास्त्रीय माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे मल्टीमिडिया प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक तपनकुमार बंद्योपाध्याय यांनी आज येथे केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री बंद्योपाध्याय प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, महाराष्ट्र बँकचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजीव कुमार, एनटीपीसीचे मानव संसाधन विभाग प्रमुख मनोरंजन सारंग, सहायक महाव्यवस्थापक जगदीश लाल भाम्बी, उप महाव्यवस्थापक कविता गोयल, जनसंपर्क अधिकारी दीप्ती यादव, हिंदी राजभाषा अधिकारी श्रीराम जावरे, विनय प्रसाद, हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुख्याध्यापक स्मिता क्षिरसागर, उपमुख्याध्यापक हणमंत मोतीबने, योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा, सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके, योग साधना मंडळाच्या अध्यक्ष रोहिणी उपळाईकर, कार्याध्यक्ष नागनाथ पाटील आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री बंद्योपाध्याय म्हणाले केंद्रीय संचार ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे प्रदर्शन सर्वांना मोबाईलवर पाहून योगा संबधी माहिती घेण्यासाठी क्यू आर कोड तयार केला आहे. याचा सर्वानी लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.
श्री सोनटक्के म्हणाले, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची स्वत: व समाजासाठी योग ही संकल्पना आहे. आपले कुटूंब हे संपूर्ण पृथ्वी आहे. आपण या सगळया कुटूंबाची काळजी घेतली पाहिजे. योग आजच्या दिनापुरता मर्यादित न राहता सर्वकाळ निरंतर करावा. असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र बँकचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजीव कुमार म्हणाले, केंद्रीय संचार ब्युरोने मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातुन लोकांना आरोग्याबाबत दक्ष केले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यानी नियमित योग, ध्यान, प्राणायाम करणे आवश्यक आहे. यामुळे मनावरील ताण-तणाव निर्माण होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ योग गुरु भुतडा यांनी मल्टीमिडिया प्रदर्शन हे सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असून नेमकपणे माहिती देणारे दालन आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असेही आवाहन त्यांनी केले.
श्री. चव्हाण म्हणाले, सामान्य लोकांना योगाबद्दल माहिती व्हावी यासाठी मल्टीमिडियाच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले. शहरातील शालेय विदयार्थी महाविदयलयीन युवक, योगी प्रेमी, योग साधक, महिला व नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट दयावी असे आवाहन केले.
प्रदर्शनामध्ये भारतीय प्राचीन योगाची माहिती आहे. यामध्ये प्रार्थना, पूरक हालचाली मानेच्या, योगासने उभी, बैठक, पाटीवरील, पोटावरील, प्राणायम, ध्यान आदीबाबत माहिती मिळणार आहे. प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असेल. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, अक्षय गवळी, क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगी, साईराज राऊळ, योगी कोंडाबत्तीन, सुरज जाधव, किरण गवळी यांनी परिश्रम घेतले.