सोलापूर प्रतिनिधी –
मनशांतीसाठी नियमित योगासने करावीत
पोलीस आयुक्त एम राज कुमार यांचे प्रतिपादन
आंतरराष्ट्रीय योग दिन हजारोच्या संख्येने सोलापूरकरांनी केला सामुहिक योगाभ्यास
“स्वत: व समाजासाठी योग’ ही यावर्षीची संकल्पना
केंद्रीय संचार ब्यूरो जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे, समन्वय समितीच्या वतीने
१० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
सोलापूर, दि. २१: नियमित योग केल्याने मनाला सुख व शांती मिळते. आयुष मंत्रालयाने योग अभ्यासासाठी दिलेले सर्व आसने अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक आहेत. योगाच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे, योगाला आपल्या दैनंदिन जिवनाचा अविभाज्य भाग बनवा असे, आवाहन पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी आज येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले.
सोलापूरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूर, जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग्य समन्वय समितीच्या वतीने सामुहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पोलीस आयुक्त एम राज कुमार बोलत होते.
श्री राज कुमार म्हणाले स्वत: व समाजासाठी योग या संकल्पने प्रमाणे आपण सर्वानी स्वत: नियमित योग करून समाजातील लोकांना योग करण्यासाठी प्रेरित करावे आणि योगाचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते योग दिनाच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनने उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपस्थिताना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी सोमनाथ टोम्पे, उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक नितीन धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, प्रशासन अधिकारी श्रीमती हवेली, ह.दे.प्रशालेचे प्राचार्य स्मिता क्षिरसागर, योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा, एन.सी.सी. बटालियन 9 चे नायब सुभेदार बंडू गळवे, सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, राजभाषा अधिकारी श्रीराम जावरे आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकामध्ये श्री चव्हाण म्हणाले, स्वत: व समाजासाठी योग ही यावर्षी योग दिनाची संकल्पना आहे. यावर्षी देशभर माघील १०० दिवसापासून ‘योग महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत सरकारची सर्व मंत्रालयाने उत्सफुर्तपणे सहभाग घेउन रोज ‘कॉमन योग प्रोटोकॉल’ प्रमाणे सराव करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. १८ जूनला जुळे सोलापुर भागात शहरातली प्रतिष्टीत व्यक्ती, योग संस्था आणि नागरिकांची योग जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तसेच हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये ‘भारतीय योगशास्त्र’ या विषयांवर मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे याचा देखील सर्वानी लाभ घ्यावा. महाराष्ट्रामध्ये प्रथमच शहरातील सर्व योग संस्थानी एकत्रितपणे हजारोंच्या संख्येने योग दिन उत्साहात साजरा करत असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी मंगळवेढाच्या जवाहरलाल श. हायस्कूलच्या विध्यार्थीनी गौरी मोरे, वैष्णवी माले, चैतन्या चव्हाण यांनी म्युझिकल योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशा कसरती करून उपस्थितांची मने जिंकली. दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सुरुवातीला पुष्कराज गोयल व जितेंद्र महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली साधना पाये, सोनाली जगताप, विद्या होनमोडे, तन्मय पाये, वृषभ दायमा, विजय क्षीरसागर, यांनी शंखध्वनी करून योगाभ्यासाची सुरुवात केली. आयुष्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे सुरुवातीला भारतीय योग संस्थानच्यावतीने अशोक रसाळ आणि धनंजय कुलकर्णी यांनी शिथिली करण्याचे व्यायाम घेतले. योग सेवा मंडळाच्या वतीने साधना पाये यांनी उभे आसने घेतली. योग साधना मंडळाच्या वतीने रोहिणी उपळाईकर यांनी उभी आसने घेतली व विवेकानंद केंद्राच्या वतीने दिपाली कुलकर्णी यांनी पोटावरील व पाठीवरील करावयाची आसने घेतली. पतंजली योग पिठाच्या वतीने संगीता जाधव यांनी प्राणायाम व भ्रामरी प्राणायाम घेतले. गीता परिवाराच्या वतीने श्रीमती जाधव यांनी ध्यान धारणा घेतली.
यावेळी घेण्यात आलेल्या योग स्पर्धेतील रत्नप्रभा माळी, संतोष बबन दुधाळ, सोनाली जगताप, शिवराज पाटील, मेघश्याम साखरे, दत्तात्रेय चिवडशेट्टी यांना योगगुरू आणि तन्मय पाये व ओंकार औरसंग यांना योग युवारत्न पुरस्कार देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शास्त्री यांनी केले. अंबादास यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सोलापूर शहरातील पोलीस आयुक्तालयाचे हवालदार श्री ठोसर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बँड पथकाने अतिशय सुरेख देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच योग संचालनाच्यावेळी धून वाजवून उपस्थितीना मंत्रमुग्ध केले.
सदरील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी सहा पासूनच उपस्थितांनी गर्दी केली होती. यावेळी उपमुख्याध्यापक हनमंत मोतीबने, पतंजली योगपीठाचे रघुनंदन भुतडा, प्रभाकर जाधव, योग असोसिएशनचे डी एम वेदपाठक, विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चितापूरे, डॉ शोभा शहा, भारतीय योग संस्थाचे दत्तात्रय चिवडशेट्टी, राजशेखर लशमेश्वर, योग सेवा मंडळाचे सुनील आळंद, संतोष सासवडे, योग साधना मंडळाचे नागनाथ पाटील, रमेश सोनी, रुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योगच्या संगीता जाधव, एन.सी.सी. बटालियनचे अधिकारी आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, अक्षय गवळी, क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगी, साईराज राऊळ, योगी कोंडाबत्तीन, सुरज जाधव, किरण गवळी यांनी परिश्रम घेतले.
शहरातील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक, क्रीडा संस्था, महाविद्यालये, आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*