Solapur Tuljapur ST Bus
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत तर अमृत जेष्ठ नागरिकांना संपूर्ण १००टक्के सवलत आहे.
सोलापूर – नवरात्रोत्सव निमित्त लाखो भाविक तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जात असतात. पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटकहुन तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सोलापूर येथून रोज १६० बस गाड्यांचे नियोजन तुळजापूरसाठी केले आहे.
सालाबाद प्रमाणे सोलापूर विभागामार्फत तुळजाभवानी ,तुळजापूर नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सोलापूर विभागातून एकूण १६० जादा बसेस धावतील. तसेच सोलापूर – तुळजापूर तामलवाडी मार्गे
बार्शी -तुळजापूर अशा मार्गावर भाविकांची वाहतूक करतील.
——
चौकट
सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रवासी भाविकांनी महामंडळाच्या बस सेवेचा वापर करावा, महामंडळाच्या बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत तर अमृत जेष्ठ नागरिकांना संपूर्ण १००टक्के सवलत आहे, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत आहे. असे वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सांगितले आहे.
——-
चौकट
सोलापूर आगार – १९ बसेस
पंढरपूर आगार – १० बसेस
बार्शी आगार – ४२ बसेस
अक्कलकोट आगार – १५ बसेस
करमाळा आगार – १० बसेस
अकलूज आगार – १५ बसेस
सांगोला आगार – १७ बसेस
कुर्डूवाडी आगार – २१ बसेस
मंगळवेढा आगार – ११ बसेस
एकुण – १६० बसेस